Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री ! संतापून म्हणाले, ‘मी काहीही फोडू शकतो…’

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. याआधी घरात कल्ला केलेल्या डॉ. अभिजीत बिचुकलेची आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री होणार आहे. अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे. बिचुकले म्हणतोय,”डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार”. अभिजीतच्या एन्ट्रीला ‘मैं हूँ डॉन” हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसणार आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतोय,”बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला…मी काहीही फोडू शकतो या घरातलं”. असं बोलताना दिसतात.





