bigg boss marathi 3 : ‘बिग बॉसच्या मीराला अश्रु अनावर…!

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या घारतील काही सदस्यांनी नियमभंग देखील केले. आणि याचमुळे बिग बॉस यांनी सदस्यांची कडक शब्दात केवळ कानउघडणीच नाही केली तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले.
दरम्यान, घरात हे सगळे राडे घडत असतानाच मीरा गायत्री समोर तिचं मनं मोकळं करताना दिसणार आहे. कालसमोर आलेल्या प्रोमोनुसार मीरा गायत्रीसोमर तिची खंत व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तिला अश्रु अनावर झाले, आणि तिचा बांध तुटला.
मीरा गायत्रीसमोर ढसाढसा रडली. नक्की असं काय घडलं ? कोणी मीराला दुखावालं ? कोणाच्या वागण्याचे मीराला इतके वाईट वाटले असावे ? मीरा गायत्री म्हणाली, “मला ऐकवायचे आहे… नाहीतर भांडायचे आहे… मला काहीतरी बोलायचे आहे, नाहीतर नाही होणार माझ्याकडून, माझ्या मनामधून नाही निघणार… नाही सहन होतं….” असं मीरा म्हणते.





