‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेनं घेतली राज ठाकरेंची भेट; कारण अद्याप गुलदस्त्यात…

मुंबई – 12 फेब्रुवारीला बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा झाली तेव्हा एक नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला. प्रियंका चहर चौधरी किंवा शिव ठाकरे विजेते ठरतील असे चाहते गृहीत धरत होते. मात्र सलमान खानने एमसी स्टेनचे नाव घेताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, आता बिग बॉस’च्या या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर उपविजेता असलेला शिव ठाकरे याने नुकतंच शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
View this post on Instagram
मराठमोळ्या शिवने ‘बिग बॉस हिंदी’मधील सदस्यांसह प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली आहे. टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन राहिला होता.
दरम्यान, बिग बॉस फेम शिव ठाकरेने राज ठाकरेंची भेट का घेतली? याचं अद्याप कारण समोर आलेलं नाही. ‘बिग बॉस हिंदी’मध्ये सहभागी होण्याआधी शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर तो हिंदी बिग बॉस मध्ये सहभागी झाला होता.





