Elvish Yadav: ‘बिग बॉस’ फेम एल्विश यादव मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात; शेअर केला खास फोटो
Elvish Yadav: एल्विशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने एका मुलीचा हात हातात घेतल्याचं दिसत आहे.

Elvish Yadav: बिग बॉस फेम एल्विश यादव मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. सोशल मिडियावर एल्विशने त्याबाबत जाहीररित्या कबुली दिली आहे. अभिनेत्री जिया शंकरसोबत एल्विश यादवने साखरपुडा केला असल्याची चर्चा सध्या एका फोटोमुळे रंगली आहे.
एल्विशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने एका मुलीचा हात हातात घेतल्याचं दिसत आहे. त्या मुलीच्या हातात अंगठी दिसत आहे. त्याने जिया शंकरला हा फोटो टॅग केले आहे आणि लिहिले की, “प्रेमाला आणखी एक संधी दिली आणि मला माझं प्रेम मिळालं.” ही पोस्ट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
दरम्यान, एल्विशने खरोखरच साखरपुडा केले आहे की हे आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन आहे अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. मात्र चाहत्यांनीही या कपलला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. परंतु एल्विश किंवा जिया यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोघांनी साखरपुड्याच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली जेव्हा जिया शंकरनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एल्विशची पोस्ट पुन्हा शेअर केली. Elvish Yadav
दरम्यान, काही दिवसांपासून जिया शंकरचा मिस्ट्री मॅन कोण? अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर तेआता समोर आलं आहे. जिया एल्विश यादवला डेट करत असल्याचे चाहत्यांना कळलं आहे. जियाने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमात ती दिसली होती.
एल्विश यादवच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि सोशल मिडिया इंफ्लुइन्सरसोबत जोडलं आहे. ज्यात नाव मनीषा राणी, कीर्ती मेहरा, अंजली अरोरा, उर्वशी रौतेला आणि जन्नत झुबेर यांचा समावेश आहे. Elvish Yadav:
हेही वाचा:







