बिग बॉस फेम अभिनेता असीम रियाझ आणि हिमांशी खुरानाचे ब्रेकअप; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

Entertainment : बिग बॉस 13 फेम अभिनेता असीम रियाझ (Asim Riyaz) आणि हिमांशी खुराना (Himanshi Khurana) यांनी अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हिमांशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत असीमसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे कपल चर्चेत होते. अखेर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे.
हिमांशी खुरानाने पोस्ट करत लिहिले की, ‘होय, आम्ही आता एकत्र नाही आहोत. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप चांगला होता, पण आता आम्ही एकत्र नाही. आमच्या नात्याचा प्रवास छान होता आणि आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माचा आदर करत असताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक समजुतींमुळे आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत. आमचे एकमेकांविरुद्ध काहीही नाही. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती करतो.” या पोस्टद्वारे हिमांशीने ब्रेकअपमागचे कारण देखील सांगितले आहे.
— Himanshi khurana (@realhimanshi) December 6, 2023
दरम्यान, हिमांशी आणि असीम यांची भेट ‘बिग बॉस 13’ च्या घरामध्ये झाली होती. या शोदरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि त्यांनी टीव्हीवर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. हिमांशीने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. चाहते या कपलला ‘असिमांशी’ म्हणत असे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट झाले. मात्र आता अनेक वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर हिमांशी आणि असीम वेगळे झाले आहे.





