मराठी बिग बॉस सिझन 5 सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यादरम्यान आता हिंदी बिग बॉसचा 18 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानचे चाहते तर या शोकडे डोळे लावून बसलेले असतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या शोच्या शुटिंगलादेखील सुरुवात केल्याचे समजत आहे. बिग बॉस 18 शोमध्ये यंदा किती आणि कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याची संभाव्य यादी आता समोर आली आहे. या यादीमध्ये कोणाकोणाची नावे आहेत चला पाहुयात… बिग बॉस 14 च्या संभाव्य स्पर्धकांची यादी सुधांशू पांडे अनिता हसनंदानी जान खान धीरज धुपर मीरा देवस्थळे सुरभी ज्योती अलिशा पनवार शाहीर शेख फैसल शेख समीरा रेड्डी अंजली आनंद चाहत पांडे रीम शेख सुनील कुमार बिग बॉस 18 मध्ये अब्दू रोजिकही दिसणार निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी बिग बॉस 16 सीझनमधील चर्चित स्पर्धक अब्दू रोजिक देखील बिग बॉस 18 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. अब्दू रोजिक यावेळी स्पर्धक म्हणून नाही तर सलमान खानसोबतच्या एका खास सेगमेंटसाठी होस्ट म्हणून सामील होणार आहे. त्यामुळे हा सिझन अजून रंगतदार होण्याची शक्यता आहे.