Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट; पीडित तरुणीच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती, नराधमाने एकदा नव्हे तर…

पुणे: शहरातील स्वारगेट बस डेपोत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचारी करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे शहरासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. घडलेल्या धक्कादायक घटनेने स्वारगेट बस डेपोवर सर्व स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे (वय ३६) या संशयित आरोपीने तरुणीवर बलात्कार केला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली. आता पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट आला असून, या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये नराधम दत्तात्रय गाडे याने एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याची स्पष्ट झाले आहे. बुंधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाने हा मेडिकल रिपोर्ट पोलिसांना दिला. पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना केली आहे. घटनेची सविस्तर माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी काल माध्यमांना दिली.
आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनदा बलात्कार केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना स्वारगेट पोलीस स्थानकापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत घडल्याने याचा कोणालाही पत्ता लागत नाही, यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
त्या सुरक्षा रक्षकांचे निलंबन
या तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर स्वारगेट आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २४ सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकाने घेतली असून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरूवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात गुंडाची दहशत, चोरी, खून आणि बलात्कार या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.





