…तर यशश्रीचा जीव वाचू शकला असता; उरण हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा

नवी मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकारणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आरोपी दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? याचा धक्कादायक खुलासा त्याने पोलिसांसमोर केला. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. यामध्ये पोलिसांनी वेळीच आरोपी दाऊद शेखवर कारवाई केली असती तर कदाचित यशश्रीचा जीव वाचू शकला असता.
…तर यशश्रीचा जीव वाचू शकला असता
यशश्रीच्या हत्येच्या 5 दिवस आधीच आरोपी वर दाखल पोस्को गुन्ह्यात पनवेल न्यायालयाने दाऊद शेख विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढून त्याला लवकर अटक करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. पोलिसांनी या आदेशाचे गांभीर्याने पालन केले असते तर दाऊदने हत्या करण्याअगोदर त्याला अटक केली असती तर कदाचित यशश्रीचा जीव वाचू शकला असता.
काय घडले नेमके?
प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सूडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगदा आणि सतत होण्याऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं.
हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. हत्येनंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. याप्रकारणात अद्याप यशश्रीचा मोबाईल आणि हत्या केलेले हत्यार पोलिसांना सापडले नसून आरोपीज्या फोटो द्वारे ब्लॅकमेल करत होता त्या फोटोचा शोध देखील पोलीस घेत आहेत.





