सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मृत्यूेचे सत्य समोर येणार? कुटुंबीयांने घेतला मोठा निर्णय

Sushant Singh Rajput death case : देशाला हादरवून सोडणारी घटना १२ जून २०२० मध्ये घडली होती. बॅालिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली होती.
तसेच घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून, सुशांतच्या कुटुंबियांनी सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही या क्लोजर अहवालाविरुद्ध याचिका दाखल करू आणि लवकरच सत्य समोर आणू, असे सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.
सुशांत सिंहच्या मृत्यूला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्यापही मृत्यूचे खरं कारण समोर आलेले नाही. CBI ने मार्च 2025 मध्ये दोन क्लोजर अहवाल दाखल केले होते. आता सुशांतच्या कुटुबीयांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, CBI ने आपल्या क्लोजर अहवालात रिया चक्रवर्तीने सुशांतला बेकायदेशीरपणे कैद करून ठेवले, धमकावले, आत्महत्येस प्रवृत्त केले किंवा त्याचे पैसे आणि मालमत्ता बेकायदेशीररीत्या हस्तगत केली, याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असे म्हटले आहे.
मात्र, सुशांतचे कुटुंब आणि त्यांच्या वकीलांनी हा अहवाल अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास देशातील सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक राहिला आहे. अहवालानुसार, 8 ते 14 जून 2020 दरम्यान सुशांतने आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत कोणताही आरोपी नव्हता.
10 जूनला सुशांतने शोविकशी व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता, परंतु 8 ते 14 जूनदरम्यान रियाशी त्यांचा कोणताही संपर्क झाला नव्हता. अहवालात म्हटले आहे की, रिया किंवा तिच्या कुटुंबीयांची सुशांतशी भेट किंवा संपर्क याचा कोणताही पुरावा आढळला नाही. मात्र, कुटुंबाचे म्हणणे आहे की हा तपास अपूर्ण आहे. यामुळे आता या प्रकरणात पुढे काय समोर येणार, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





