Rahuri by-election : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट; माजी मंत्री भाजपमध्ये जाणार? शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
Rahuri by-election : शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यानंतर यावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Rahuri by-election राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजपच्या विनंतीनंतर त्यांनी या पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. “तत्त्व आणि निष्ठा जपणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे,” असे ते म्हणाले होते. त्यांनी सांगितले की, अनेक संधी असूनही त्यांनी सत्तेत जाण्याऐवजी पक्षनिष्ठा जपली, मात्र त्याचा राजकीय तोटा सहन करावा लागला.
तनपुरे यांनी उदाहरण देत म्हटले की, त्यांच्या सोबत पक्षात असलेले काही नेते अजित पवार गटात गेले आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली. “आम्ही मात्र तत्त्वांशी प्रामाणिक राहिलो, पण आजच्या राजकारणात तडजोड करणाऱ्यांनाच सत्तेत मोठी पदे मिळतात,” त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Rahuri by-election)

Rahuri by-election : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट; माजी मंत्री भाजपमध्ये जाणार? शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
यानंतर आता शरद पवार गटाकडून याविषयी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “सध्याच्या राजकारणात विरोधी पक्षच उरू नये, असा प्रयत्न सुरू आहे. विविध गुन्हे दाखल करून दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. ही लोकशाही नाही,” अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. Rahuri by-election
राहुरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या चुरशीचा मतदारसंघ मानला जातो. येथे निवडणुका नेहमीच बहुकोनी आणि स्पर्धात्मक राहिल्या आहेत. हा मतदारसंघ स्थानिक पातळीवर सहकार, साखर कारखाने आणि शेती राजकारणासाठी ओळखला जातो.
हेही वाचा : Hapus Mango : चाकणच्या बाजारात हापूसचा थाट! डझनाला मोजावे लागतायत ‘इतके’ रुपये; पाहा का कडाडले भाव





