पुणे जिल्हा | एमएचटी सीईटीमध्ये आचार्यचे मोठे यश

बारामती, (प्रतिनिधी)- राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी तसेच कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेचा नुकताच निकाल लागला. यामध्ये 1729 आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे.
सई शिंदे (99.72 ), रणवीर घाडगे (99.70 ), अर्शद कोरबू (99.54 ), मृणाल कडू (99.54) या विद्यार्थ्यांनी 99.50 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकूण 12 विद्यार्थ्यांना 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. याखेरीज आचार्यचे 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेले तब्बल 124 विद्यार्थी आहेत.
राज्यातून 6.75 लाख विद्यार्थ्यांनी राज्यभरातील 159 केंद्रांवर ही परीक्षा दिली होती. बारामतीच्या १७२९ आचार्य अॅकॅडमीने अवघ्या ८ वर्षात बारामतीसह इंदापूर व पुणे शहरातील वाकड आणि रहाटणी येथे काम सुरु केले असून येथील शेकडो विद्यार्थ्य़ांना आयआयटी,
एनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एनडीएसह विविध नामवंत शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळालेला आहे. संस्थेचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकूळे, संचालक सुमीत सिनगारे, कमलाकर टेकवडे व प्रवीण ढवळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





