Breaking News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘एकनाथ शिंदे’ हेच शिवसेनेचे गटनेते
Updated On:

मुंबई – अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधिमंडळांत आज एक मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाने एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. तर अजय चौधरी यांची मान्यता रद्द केली आहे. विधीमंडळ सचिवालयानं तसं पत्र एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
भरत गोगावले हेच शिंदे गटाचे प्रतोद असणार आहेत. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना पुढे काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



