जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मोठा दिलासा; ‘या’ कारणामुळे केला जामीन मंजूर

Asaram Bapu Bail | बलात्काराच्या एका प्रकरणात बराच काळ तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला.
आसाराम बापू 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र आता वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
अटींसह जामीन मंजूर
परंतु अंतरिम जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाने आसाराम यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय जामीनादरम्यान कोणत्याही अनुयायांना भेटु नये, अशा कडक सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करताना सोबत पोलीस तैनात करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. Asaram Bapu Bail |
आसारामच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अनेकवेळा अर्ज दाखल केले आहेत. केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करता येईल, असे न्यायालयाचे स्पष्ट म्हणणे आहे. तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. २०१३ मध्ये आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम यांना इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये त्यांना पोस्को न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
हेही वाचा:
डेंग्यूनंतर टायगर श्रॉफची अशी झाली अवस्था, सोशल मीडियावर शेअर केला फोटो





