Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा! 96 तासांत घरपोच मिळणार गॅस सिलिंडर; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश
Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे.

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात सिलेंडर मिळवण्यासाठी उन्हाचे चटके घ्यावे लागले.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तथाकथित तुटवडीच्या अफवांमुळे ही गोष्ट घडली आहे. अशातच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस (Gas) सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudy) यांनी दिले आहे.

Jitendra Dudy
तसेच गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये असा संदेश (SMS) पाठवावा, असेही सांगण्यात आले. गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या महत्वाच्या सूचना दिल्या Pune News
१ गॅस सिलिंडर वितरणावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी लक्ष ठेवावे.
२ गॅस एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी संबंधित पोलिस स्टेशनने नियमित पाहणी करावी.
३ गॅस एजन्सीकडून सिलिंडर वितरणासाठी पोलिस मदत मागितल्यास नियमानुसार मदत पुरवावी.
३ गॅस सिलेंडर वितरणात अडथळा आणणे किंवा हस्तक्षेप झाल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
अशा महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासकीय यंत्रणेंना दिल्या आहेत.
पुणेकरांना मोठा दिलासा Pune News
पुणेकरांमध्ये गॅस सिलेंडर मिळण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. गॅस सिलेंडरचा साठा अपुरा असल्याने गॅस सिंलेडर देण्यात अडचणी येत असून, आगामी काळात हे संकट अधिक गहिरे होईल अशी भीती होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुणेकरासंह जिल्ह्यातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : Bollywood News: नोरा फतेहीच्या वादग्रस्त गाण्याचे बोल लिहिणारा गीतकारच ‘पुष्पा 2’चा सुपरहिट लेखक!





