पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील. याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”. बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे. पुण्यातील सध्यस्थिती – पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम – पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती – पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार – जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता – आठवड्याची परिस्थिती पाहता निर्बंध कडक लागण्याची शक्यता – बैठकीत लॉकडाऊन नकोचा सूर पण कडक निर्बंध लावण्याची मागणी 2 एप्रिल 2021 पुणे जिल्ह्याची बेड स्थिती एकूण बेड्सची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 9118 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093 – आयसीयु बेड्स – 2927 – व्हेंटिलेटर्स बेड – 996 उपचार बेडची स्थिती ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974 ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563 आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073 व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376 शिल्लक बेडची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 6144 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530 – आयसीयु बेड्स – 1854 – व्हेंटिलेटर्स बेड – 620 रुग्ण संख्येची स्थिती – ऍक्टिव्ह रुग्ण – 61740 – रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 ) – घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754 12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान – ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील – 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल – 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील – 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल जिल्ह्याचा मृत्युदर – पुणे मनपा – 2 टक्के – पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के – पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के – पुणे ग्रामीण – 1.9 टक्के – पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8