मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ऐन वेळी ‘या’ तारखांचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नवं वेळापत्रक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील हिवाळी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, याच काळात होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि महापालिका निवडणुका होत असल्याने विद्यापीठाने ११, १४, १५ व १६ जानेवारी रोजी होणारे पेपर पुढे ढकलले आहेत या तारखांना होणारी परीक्षा आता अनुक्रमे २२, २३, २४ व २५ जानेवारीला होईल.
हिवाळी परीक्षांसाठी राज्यातील २६९ परीक्षा केंद्रांवर तयारी केली आहे. परीक्षेसाठी एकूण १ लाख ४९ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ११ जानेवारी रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग क ची परीक्षा.
तसेच, महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला होणारे मतदान आणि १६ जानेवारीची मतमोजणी यामुळे अनेक विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणा त्यात व्यस्त असणार आहे. यामुळे परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे.





