ICC Cricket World Cup 2027 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर होणार
ICC Cricket World Cup 2027 : या बहुप्रतीक्षित स्पर्धेचे वेळापत्रक आज, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार जाहीर करण्यात येणार आहे.

ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ ची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये शिगेला पोहोचली आहे. या मेगा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक १ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे एका भव्य कार्यक्रमादरम्यान जाहीर केले जाणार आहे.
मात्र, या बहुप्रतीक्षित स्पर्धेचे वेळापत्रक आज, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार का? तसेच दोन्ही संघ आमनेसामने कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा असणार कालावधी
एकदिवसीय विश्वचषक २०२७ ही स्पर्धा ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत खेळवली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेच्या स्वरूपात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असून, त्यापैकी ११ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
उर्वरित संघाची निवड सुपर सिरीज फेरीतून होणार आहे. या फेरीत कमी मानांकन असलेले तीन संघ प्रत्येकी दोन सामने खेळतील. या सामन्यांनंतर सर्वोच्च कामगिरी करणारा संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश करून १२वा संघ बनेल. उर्वरित दोन संघांचं आव्हान याच टप्प्यावर संपेल.
यानंतर १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक गटात सहा संघ असतील. गटातील अव्वल तीन संघ पुढील सुपर ७ फेरीत प्रवेश करतील. या फेरीत सातही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील.
सुपर ७ फेरीअखेर गुणमालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यावेळी पहिल्या क्रमांकावरील संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचा सामना तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल.
येथे पाहता येणार वेळापत्रक
दरम्यान, विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार असून, ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Rahul Gandhi: ‘फॉर्म 6 वर हा आदेश कोणी दिला?’ ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट सवाल





