Chhagan Bhujbal : मोठी बातमी! पार्थ पवार-भुजबळांमध्ये वाद? बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal : पार्थ पवारांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे छगन भुजबळ यांचा संयम सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्यात एका ठेकेदाराच्या टेंडरवरून जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
या घटनेमुळे राष्ट्रवादीत ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा सुप्त संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्नधान्य पुरवठ्याचे टेंडरवरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हे टेंडर एका विशिष्ट ठेकेदाराला देण्यात यावे, अशी मागणी पार्थ पवार यांनी केल्याचे सांगितले जात आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला त्यांनी थेट भुजबळांकडे पाठवल्याचीही चर्चा आहे.
मात्र, एखाद्या ठराविक ठेकेदारालाच काम देण्यास छगन भुजबळ यांनी स्पष्ट नकार दिला. “विशेष कारण नसताना एका ठेकेदारालाच कंत्राट का द्यायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं समजतं. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : Weather update : चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनचे आगमन लांबणार? महत्वाची अपडेट समोर
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचं चित्र दिसत आहे. याआधीही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत पार्थ पवार यांचे मतभेद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यात भुजबळांचं नाव जोडल्याने पक्षातील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे.
या घडामोडींवर अद्याप पार्थ पवार किंवा छगन भुजबळ यांनी अधिकृत भूमिका मांडलेली नाही. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत वारंवार होणारे मतभेद राष्ट्रवादीसाठी भविष्यात अडचणीचे ठरू शकतात.
छगन भुजबळांनी सुनावलं?
पार्थ पवारांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे छगन भुजबळ यांचा संयम सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासकीय नियम आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते, याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यात असा थेट हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक शब्दांत छगन भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : Bashir Badr: “स्वतःच्या कविता विसरलेले शायर”; बशीर बद्र यांचं ९१ व्या वर्षी निधन





