मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात तब्बल 700 जणांना विषबाधा
Updated On:

मुंबई : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.





