मोठी बातमी ! अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांना मंगळवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यानुसार ईडीने त्यांना न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
तत्पूर्वी अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते.
Mumbai: Special PMLA court sends former Maharashtra Minister Anil Deshmukh to ED custody till November 6 in connection with extortion and money laundering case pic.twitter.com/F0EFJehJ8W
— ANI (@ANI) November 2, 2021
त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली होती.



