‘स्टुडंट ऑफ द इअर 3’बाबत करण जोहरकडून मोठी माहिती समोर; चित्रपट नाही तर…

Student Of The Year 3 Updates| दिग्दर्शक करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चांगली कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तीन कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले.
त ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत होते. यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा सिक्वेलची येणार असल्याचे म्हंटले जात आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सिनेस्टार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चे अपडेट दिले आहे. Student Of The Year 3 Updates|
‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चित्रपट म्हणून नाही तर वेबसीरिज म्हणून प्रदर्शित करण्याचा प्लान असल्याचेही सांगण्यात आले आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन ‘नॉक्टरनल बर्गर’ फेम रीमा माया करणार असल्याचे करण जोहरने सांगितले. शनाया कपूर ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’मधून चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हंटले जात आहे. Student Of The Year 3 Updates|
कोण आहे रीमा माया?
रीमा माया या चित्रपट निर्मात्या असून त्या शॉर्ट फिल्म्स बनवण्यासाठी ओळखल्या जातात. अलीकडेच त्यांनी ‘नॉक्टर्नल बर्गर’ हा चित्रपट बनवला होता. ज्याचा प्रीमियर सनडान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये शॉर्ट फिल्म प्रोग्राम विभागात झाला. त्यांनी नेटफ्लिक्स, रेड बुल आणि बोट सारख्या ब्रँडसाठी व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत. आता त्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’चे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:





