Unmesh Patil : जळगावमध्ये मोठी घडामोड! शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; माजी खासदार फोडला
Unmesh Patil : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. जळगावमधील माजी खासदाराला गळाला लावण्यात यश आले असून, त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे.

Unmesh Patil : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे बळ वाढले. अशातच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याला गळाला लावले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का शिंदेंनी दिला आहे. या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. याबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी एक्सवरून ट्वीट करत माहिती दिली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा भगवा झेडा हाती घेतला.
📍 मुंबई |#जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत… pic.twitter.com/KP2AErsZBS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 6, 2026
आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीवेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आज महायुती सरकारने पूर्ण केले. जे बोलतो ते करुन दाखवणारी शिवसेना आहे. शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, त्यामुळेच दररोज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत असल्याचे शिंदेंनी सांगितले आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील चौधरी तसेच शिवसेना पक्षातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





