बदलापुर घटनेप्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय; चौकशीसाठी SIT गठीत करण्याचे फडणवीसांचे आदेश

Devendra Fadnavis On Badlapur School | बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“आरोपीला अटक झाली असून जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावण्यास सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा:
“आंदोलनादरम्यान बॉयफ्रेंडसह…”; कोलकाता प्रकरणावर TMC खासदाराचे वादग्रस्त विधान





