“आंदोलनादरम्यान बॉयफ्रेंडसह…”; कोलकाता प्रकरणावर TMC खासदाराचे वादग्रस्त विधान

Kolkata Doctor Rape Case| कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणी विरोधकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणावर विविध राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहे. मात्र या घटनेवर तृणमूल काँग्रेसचे खासदार अरुप चक्रवर्ती यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
खासदार अरुप चक्रवर्ती यांनी संप करणाऱ्या डॉक्टरांवर निशाणा साधला आहे. एका रॅलीदरम्यान अरुप चक्रवर्ती म्हणाले की, ‘आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही लोक घरी जाऊ शकता किंवा तुमच्या बॉयफ्रेंडसह फिरायला जाऊ शकता. तुमच्या संपामुळे हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि लोक तुमच्यावर चिडले तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही.’
‘आम्ही त्यांना वाचवू शकणार नाही’
रॅलीनंतर पत्रकारांनी त्यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते त्यावर ठाम राहिले. ते पुनरुच्चार करत म्हणाले की, ‘डॉक्टर संपावर आहेत. संपाच्या नावाखाली लोकांना उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अशा स्थितीत संप करणाऱ्या डॉक्टरांवर लोकांचा राग येईल आणि अशा परिस्थितीत आपण त्यांना वाचवू शकणार नाही, हे स्वाभाविक आहे’ . Kolkata Doctor Rape Case|
दरम्यान, याप्रकरणी टीएमसी नेते उदयन गुहा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे बोट दाखवणारी बोटे तोडण्याची व्यवस्था करावी लागेल, असे उदयन गुहा यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते उदयन गुहा म्हणाले, “जे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे बोट दाखवत आहेत, जे त्यांना सोशल मीडियावर शिवीगाळ करत आहेत, जे बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे बोटे दाखवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ती बोटे आम्हाला ओळखावी लागतील आणि त्यांना तोडण्याची व्यवस्था करावी लागेल.” त्यानंतर आता अरुप चक्रवर्ती यांनीही वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. Kolkata Doctor Rape Case|
हेही वाचा :





