Hush Money Case : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठं संकट ; शपथ घेण्यापूर्वी कोर्टात हजर राहण्याच समन्स, काय आहे प्रकरण ?

अमेरिकाः अमेरिकेच्या राष्ट्रपदाची निवडणुकीत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले. २० जानेवारी रोजी ते अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधी समारंभाच्या दहा दिवस आधी ट्रम्प यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यायमूर्ती जुआन मार्चन यांनी हा आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्यावर पॅार्न स्टार्सना गप्प बसण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप असून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. यामुळे शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठे संकट आले आहे. या प्रकरणी ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणावर न्यूयॉर्कचे न्यायाधीश जुआन मर्चन यांनी सांगितले की, ट्रम्प यांना तुरुंगवासाची शिक्षा किंवा दंड देणार नाहीत, परंतु त्यांना ‘सशर्त सुटका’ देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती जुआन मार्चन यांच्या निर्णयाचा अर्थ असा होतो की, ट्रम्प यांना 20 जानेवारी रोजी त्यांच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी 10 दिवस अगोदर न्यायालयाच्या सुनावणीत हजर राहावे लागेल. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना ‘हश मनी केस’ गुप्त धनासह ३४ प्रकरणारात दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर ते अमेरेकीच्या राष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक जिंकले होते.
JUST IN: NY judge says that President-elect Trump will not be sentenced to prison in hush money case
— The Spectator Index (@spectatorindex) January 3, 2025
प्रकरण काय आहे ?
ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचे प्रकरण 2016 चे आहे. ट्रम्प यांचे या पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याचे समोर आले असून ते लपवण्यासाठी त्यांनी स्टॉर्मीला 1 लाख 30 हजार दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एडल्ट स्टार स्टॅार्मी डेनियल्यसोबत हे संबंध सार्वजनिक करण्याची धमकी देत होती.
स्टॅार्मीने केला हा आरोप
पॅार्न स्टार स्टॅार्मीचे २००६ मध्ये ट्रम्प यांच्यासोबत अफेअर असल्याचे उघड झाले होते. तिला टीव्ही स्टार बनविण्याचे आश्वासन देऊन ट्रम्प यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता. मात्र, ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

