Kirit Somaiya | अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून हजारो बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अंजनगाव सुर्जीमध्ये 1100 रोहिंग्या, बांगलादेशींना बनावट जन्म दाखले देण्यात आल्याची माहिती समोर आली. हा गंभीर प्रकार कार्यकर्त्यांनी लक्षात आणू दिल्याचा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. “अंजनगाव सुर्जी 60 हजार लोकसंख्येची नगरपरिषद असून, या ठिकाणी २० हजार मुस्लिम आहेत. १४०० लोकांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज आले आहेत. यात जन्माचे दाखले ९८ टक्के बांगलादेशींचे आहेत. निवडणूक आचार संहिता काळात हा प्रकार झाला. ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे मिळवली, त्याची फेरतपासणी होणे आवश्यक आहे,” अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. Kirit Somaiya | तक्रारीनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांसोबत देखील आपण चर्चा केली. जन्माचे दाखले वितरित करताना राज्यातील इतर भागांमध्ये कशा प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या, याची माहिती आपण त्यांना दिली असल्याचेही यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले. Kirit Somaiya | अंजनगावात 1184 अर्जापैकी एकानेही कोणत्या ठिकाणावर जन्म झाला याचा दाखला दिला नाही. महापालिका, नगरपालिकेनं नोंद नसल्याचं सांगितलं आणि यालाही जन्म प्रमाणपत्रासाठी वैध ठरवलं गेलं. अमरावती महानगराची लोकसंख्या 6 लाखांत असून 4638 अर्ज आले आणि यातील एकाही अर्जात जन्माचा पुरावा नाही, अशीही माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. पुढे ते म्हणाले, “मी अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांशी 50 मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे आणि तथ्य समजावून सांगितलीत. मी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यासोबतच गृह सचिव आणि पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्याकडची संपूर्ण माहिती दिली आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Kirit Somaiya | हेही वाचा: Pune Trafic : पुणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात; अहवालातून ‘ही’ माहिती आली समोर, जागतिक क्रमवारीत ‘या’ स्थानावर