BIG BREAKING : ठाकरे गटाला मोठा धक्का! सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढे जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये सात सदस्यीय खडंपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. तसेच या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
#BREAKING Supreme Court Constitution bench holds that the issue whether Nabam Rebia judgement requires a reference to a larger 7 judge bench will be decided along with the merits of the case concerning #ShivSenaRift. The merits of the case will be heard on 21st Feb#SupremeCourt pic.twitter.com/DzJ0k4FWPR
— Live Law (@LiveLawIndia) February 17, 2023
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज या प्रकरणावर सुनावणी करताना एक पानी निकाल वाचला. यावेळी , नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल तपासण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडं अर्थात ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवायचं की नाही हे या खटल्याच्या मेरिट्सवर ठरवलं जाईल. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल, असे कोर्टाने म्हटले आहे.




