Big Breaking | शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

Big Breaking | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. यानंतर आज पुण्यात शरद पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे मंगलदास बांदल यांनी दुजोरा दिला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’होय, याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. या बैठकीत खासदारांसह आमदारही उपस्थित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. मात्र या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे. अशात नेते मंगलदास बांदल यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चाना दुजोरा दिला आहे.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांवर ते म्हणाले,’ शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास याचा काहीही एक परिणाम महायुतीवर होणार नाही.’





