Big Breaking : बीड प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण

पुणेः बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सीआयडीने देखील आरोपीच्या शोधासाठी ९ पथके रवाना केली होती. अशातच कराड स्वःताह सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. यामुळे आता या प्रकरणात सीआयडी काय चौैकशी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत होते. तसेच दमानिया यांनी देखील तीन आरोपींचा खून झाला असल्याचे माध्यमात सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. आता कराड सीआयडीला शरण आल्याने चौकशीत कोणते खुलासे करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयासमोर आज सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने कराड सीआयडीला शरण जाणार असल्याची बोलले जात होते. यामुळेच येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
पवन ऊर्जा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकरणात कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहिनुसार, तीन गुन्ह्यांचा तपास सीआयाडी करीत आहे. वाल्मिक कराड यांचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेश असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कराड महाराष्ट्रतच आहे असे सांगण्यात येत होते. आता या प्रकरणात कोणती मोठी माहिती समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





