BIG BREAKING : काबुल विमानतळाबाहेर स्फोट; संशयाची सुई तालिबानकडे

काबुल – काबुल विमानतळाबाहेर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांनी काबीज केल्यानंतर येथे अनागोंदी माजली असल्याचं चित्र आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या इतर देशांच्या नागरिकांसह अफगाणिस्तानी नागरिक देखील देश सोडून पलायन करण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने देशाच्या सर्व सीमा बंद केल्या असून येथून बाहेर पडण्यासाठी काबुल विमानतळ एकमेव मार्ग उरला आहे. येथे हजारो नागरिक गर्दी करत असल्याची चित्र समोर आली आहेत.
याबाबत एका उच्चपदस्थ अमेरिकी अधिकाऱ्याने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. “काबुल विमानतळाबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात मृत पावलेल्यांची व जखमींची संख्या अद्याप हाती आली नाही. याबाबत पुढील माहिती लवकरच.” असं ट्विट संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केलं आहे.
Explosion outside Kabul airport, casualties unclear at this time: John Kirby, Assistant to the Secretary of Defense for Public Affairs, US #Afghanistan pic.twitter.com/QRd1vAs0Rj
— ANI (@ANI) August 26, 2021
काबुल विमानतळाच्या एबी गेटजवळ हा हल्ला झाल्याची माहिती असून यावेळी गोळ्या देखील झाडण्यात आल्याचे वृत्त आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचं अमेरिकन वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हंटल आहे.
दरम्यान, काबूलचे विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून विमानतळाला तालिबान्यांनी वेढा दिला आहे. यामुळे स्फोटामागे तालिबान असल्याचा संशय आहे. अमेरिकेच्या सैन्याने कबूल विमानतळावर संरक्षक भिंती उभारल्या आहेत. देशातून बाहेर पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येथे गर्दी करतायेत. अमेरिकन सैन्य येत्या ३१ ऑगस्टला अफगाणिस्तान सोडून अमेरिकेला परतेल.
अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर काबुल विमानतळाची जबाबदारी अमेरिकेची नसेल असं देखील पँटागॉनने याआधीच स्पष्ट केलं आहे. १४ ऑगस्टपासून ७० हजारणाहून अधिक जणांना अमेरिकेने येथून बाहेर काढले असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.





