ठाकरे गटाला मोठा धक्का; नाशिकमध्ये 50 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : नाशिकमधील संघटना अखंड ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही दिवसांनी नाशिकमध्ये सभा घेणार होते. त्याच्या पुर्वतयारीसाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कारण ठाकरे गटाच्या नाशिकच्या 50 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. याआधी जून महिन्यात ५० आमदार फोडल्यानंतर आता नाशिकमध्ये ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये हा दुसरा झटका शिंदे गटाने दिला असल्याचे म्हटले जात आहे.
पक्षप्रवेश केल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मागच्या सहा महिन्यात जे जे निर्णय घेतले, ते सर्वसामान्य माणसांसाठी घेतले. शेतकऱ्यांपासून, युवक, महिला, शिक्षक अशा प्रत्येक वर्गाचे प्रश्न सोडविले.आम्ही बॉम्ब फोडू म्हणाले, पण खोदा पहाड और चुहा भी नही निकला.”असे म्हटले.
तसेच विरोधकांनी असा आव आणला की, सरकारने खूप मोठा घोटाळा झालाय, पण हाती काहीच लागले नाही. विरोधकांनी आधी माहिती घेतली असती तर त्यांची अशी फसगत झाली नसती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गटात प्रवेश करत आहेत, याचाच अर्थ आमचे काम त्यांना आवडत आहे. कुणीही कितीही आमच्यावर आरोप केले तरी आम्ही लोकांसाठी काम करत राहू.”
आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका
सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडकासकाळच्या भोंग्याला
पुन्हा एक चपराक बसेल
खरे मावळे कुठे आहेत
सगळ्या जगाला दिसेलबाळासाहेबांच्या नावावर
राष्ट्रवादीचे दुकान चालवले
म्हणून खरे शिवसैनिक
एकेक करून सोडून चालले#बाळासाहेबांचीशिवसेना#Maharashtra— Naresh Mhaske (@nareshmhaske) January 6, 2023
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार संजय राऊत हे संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. याआधीही संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले होते. ते गेल्यानंतर १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे जानेवारी महिन्यात सभा घेणार होते, मात्र त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसत आहे.
आज सकाळीच शिंदे गटाचे नेते आणि ठाणे मनपाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एक सूचक ट्विट केले होते. “आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका, सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी ठाकरे गटाला डिवचले होते.





