Team India : टीम इंडियाला मोठा धक्का ! चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान ‘हे’ 3 मॅचविनर खेळाडू दुखापतग्रस्त

सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. या खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियावर मोठा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तान विरूद्ध विजय मिळवल्यानंतर दोन दिवस विश्रांती घेऊन टीम इंडियाने आज सरावाला सुरुवात केली. यावेळी नेट्समध्ये रोहित आणि शमी बघ्याच्या भूमिकेत होते तर शुभमन गिल सरावाला गैरहजर होता.
‘हे’ 3 मॅचविनर खेळाडू दुखापतग्रस्त
रोहित शर्मा
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात रोहितला ही दुखापत झाली होती. ज्यामुळे तो काही काळ मैदानाबाहेर गेला होता.दुखापतीनंतरही रोहितने डावाची सुरुवात केली आणि 15 चेंडूंत 20 धावा करत भारताच्या विजयात योगदान दिले.
मोहम्मद शमी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतग्रस्त आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केवळ तीन षटके टाकल्यानंतर मोहम्मद शमीला मैदान सोडावे लागले होते. त्याच्या घोट्याला काही समस्या असल्याचे दिसून आले होते.आता ही जखम बरी होते की तो स्पर्धेबाहेर होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शुभमन गिल
टीम इंडियाचा ओपनर आणि पकर्णधार शुभमन गिलही बुधवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही. तो आजारी असल्याचे समजत आहे. रोहित शर्मा,शुभमन गिल आणि मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने न्युझीलंडविरूद्ध सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.





