Ram Nath Kovind : सरत्या वर्षाला निरोप देत मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

त्र्यंबकेश्वरः नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देत राज्यातील प्रमुख मंदिरांवर देवदर्शन घेण्यात येत आहे. देशाच्या राष्ट्रपती दौर्पदी मूर्म आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवायसियांना त्यांच्या एक्स अकाऊंटवरून नवं वर्षांच्या शुभेच्या दिल्या आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील सहपरिवार नाशिक येथी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा उपस्थित होता.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. ३१ डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोविंद यांचे आगमन मंदिर परिसरात झाला. यावेळी मंदिर विश्वस्त कैलास घुले, विश्वस्त रूपाली भुतडा यांनी कोविंद यांचे स्वागत केले. सभामंडपात त्यांच्या हस्ते पूजा अभिषेक करण्यात आला. यावेळी आपण देश व विश्वाच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना करीत असल्याचे कोविंद यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, प्रांताधिकारी पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नगरपरिषदेचे अमोल दोंदे, नितीन शिंदे उपस्थित होते.





