भुवनेश्वर कुमार संघात नसल्यामुळेच नुकसान
Updated On:

नवी दिल्ली – भारतीय संघात स्विंग गोलंदाजीवर हुकूमत असलेल्या भुवनेश्वर कुमारचा समावेश नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ बॅकफूटवर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर तर भुवनेश्वरची उणीव जास्तच जाणवू लागली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याचा समावेश भारतीय संघात नसल्यामुळे या मालिकेतही संघाला यश मिळेल का, असा प्रश्न पडला आहे.
इंगलंडमधील वातावरण भुवनेश्वरच्या गोलंदाजीसाठी उपयुक्त असते. त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. तो पूर्ण तंदुरुस्त असल्यानंतरही त्याला संघात स्थान का देण्यात आले नाही, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.





