अष्टापुरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

वाघोली – अष्टापुर तालुका हवेली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई सुभाष जगताप यांच्या जिल्हा परिषद फंडातून जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या दुरुस्तीसाठी व अंगणवाडी साठी वर्गखोली निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई जगताप, पंचायत समिती माजी सदस्य सुभाष जगताप, अष्टापुरच्या विद्यमान सरपंच कविता योगेश जगताप, उपसरपंच सुभाष कोतवाल, माजी उपसरपंच कालिदास कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, संजय कोतवाल, अलका कोतवाल, सुरेश कोतवाल, आबासाहेब कोतवाल, तया जी जगताप, शिवाजी कोतवाल, अभिमान कोतवाल, महेश ढवळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेवेळी नवनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, योगेश जगताप, मयुर कोतवाल, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष किरण कोतवाल, जि. प. शिक्षक कांबळे, केंद्रप्रमुख मोरे, शिक्षिका खांदवे,अंगणवाडी शिक्षिका, सचिन माकर आदी उपस्थित होते.





