“भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश महाराष्ट्र सरकारला बळकट करेल”; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Chandrashekhar Bawankule | छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आमदार धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे. आज सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवनात त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. यासंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “छगन भुजबळ यांनी नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. ते ओबीसी नेते आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने महाराष्ट्र सरकार बळकट होईल. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी भुजबळ यांना संधी देत चांगले काम केले आहे. भुजबळ विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावतील,” असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. Chandrashekhar Bawankule |
#WATCH | Nagpur | On NCP leader Chhagan Bhujbal to take oath as Maharashtra minister, Maharashtra Minister and State BJP Chief Chandrashekhar Bawankule says, “…Chhagan Bhujbal is known as an OBC leader and the inclusion of NCP leader Chhagan Bhujbal in the cabinet will… pic.twitter.com/G4Xy7iH2nl
— ANI (@ANI) May 20, 2025
;
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत देखील बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले.
छगन भुजबळ यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज सकाळी १० वाजता राजभवनामध्ये पार पडणार आहे. ५० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजभवनामध्ये काल रात्रीच तयारी करण्यात आली.
गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे अडचणीत आले या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खातं हे कुणाकडे जाणार याबाबत चर्चा होती. अखेर हे खातं अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. Chandrashekhar Bawankule |
हेही वाचा:
Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रिपद…! छगन भुजबळांची असामान्य राजकीय घौडदौड!





