भिर्रर्रर्र…! काठापूर बुद्रुकच्या यात्रेत धावले 170 बैलगाडे

महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या स्पर्धेत विविध इनाम
लाखणगाव : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती उत्साहात पार पडल्या. बैलगाडा शर्यतीत रोशनकुमार निवृत्ती करंडे (काठापूर) यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबीचा मानकरी ठरला.
या शर्यतींमध्ये 170 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यावेळी रोशनकुमार करंडे काठापूर यांचा बैलगाडा 10 सेकंद 97 मिली पॉइंटमध्ये येऊन घाटाचा राजा या किताबाचा मानकरी ठरला. यावेळी पहिल्या क्रमांकाचा फळीफोड सुशांत रोडे (पोंदेवाडी), दुसरा किशोर करंडे, तिसरा कपिल विश्वासराव थोरांदळे, चौथ्यात प्रथम अरूण पाचारणे (लाखणगाव) हे बैलगाडे आले.
फायनलमध्ये प्रथम पांडुरंग सोनवणे (शिंगवे), दुसरा कै. सचिन भंडलकर (राजगुरूनगर), तृतीय हर्षल कोकणे, सावता महाराज बैलगाडा संघटना यांचे बैलगाडे आले. उत्सवामध्ये 85 हजार रुपये इनामाचे बैलगाडा मालकांना वाटप करण्यात आले.
यात्रेमध्ये सरपंच अशोक करंडे, उपसरपंच विशाल करंडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मंगेश करंडे, उपाध्यक्ष कमलेश नरवडे, अध्यक्ष कुंडलिक जोरी, उपाध्यक्ष सुनील करंडे, राहुल भुरके, अशोक जोरी, लक्ष्मण करंडे, संतोष करंडे, किशोर करंडे, पप्पू शितोळे, सागर हुले, नवनाथ लोंढे, काळुराम टिंगरे, बजरंग करंडे, तसेच ग्रामस्थांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, पोपट थिटे यांनी भेट दिली. घाटाचे उद्घाटन नंदुशेठ कोकणे, एकनाथ मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी लहु थाटे आणि पारगाव पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्या आला होता.




