भोसरी, दिघी रोड करोनाचे ‘हॉटस्पॉट’

करोनाबाधितांची संख्या 48 वर; तरीही निम्मे शहर व्यापले
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या 48 झाली आहे. शहरातील भोसरी, दिघी रोड या परिसराचा समावेश असलेल्या इ प्रभागामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे हा भाग शहरातील “हॉटस्पॉट’ ठरला असून याठिकाणी तब्बल 12 रुग्ण आहेत.
हे आहेत सुरक्षित
शहरातील “अ’ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत असलेल्या संभाजीनगर, मोहनगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर व भाटनगर या भागात करोनचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तर “ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बिजलीनगर, चिंचवड़ेनगर, रावेत, काळेवाडी भागातही करोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच “ड’ क्षेत्रीय भागात वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात करोनाचा एकही
रुग्ण नाही.
“इ’मध्ये सर्वाधिक रुग्ण
शहरातील “इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. त्यामुळे हा भाग करोनाचे “हॉटस्पॉट’ ठरले आहेत. या कार्यालयाअंतर्गत भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी हे भाग येतात. याठिकाणी सर्वाधिक 12 रुग्ण आहेत. “फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनानगर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांर 22 या भागात करोनाचे दोन रुग्ण आहेत.
येथेही शिरकाव
“ग’ क्षेत्रीय मध्ये येणाऱ्या पिपंरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी व “ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, नवी सांगवी, सांगवी या भागात चार-चार रुग्ण आहेत. “क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरुनगर, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर या भागात करोनाचे आठ रुग्ण आहेत.





