Bhosari Crime : पतीला घरी बोलावून दारू पाजली अन् प्रियकराच्या मदतीने…; पत्नीचे भयंकर कृत्य

Bhosari Crime : पतीने ओरडतानाचा व्हिडिओ पत्नीनेच केला रेकॉर्ड; कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ.

Updated On:
Bhosari Crime : पतीला घरी बोलावून दारू पाजली अन् प्रियकराच्या मदतीने…; पत्नीचे भयंकर कृत्य

Bhosari Crime – कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला घरी बोलावून दारू पाजली. त्यानंतर रबरी पाइप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास घडली. तसेच प्रियकर पतीला मारत असल्‍याचा व्‍हिडिओ देखील आपल्‍या मोबाइलमध्‍ये तयार केला. अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. मु. केळवडे, ता. भोर, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या पतीचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नीने फिर्यादी पती अमोल यांना शनिवारी दुपारी आपल्‍या भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे यांनी फिर्यादीला दारू पाजली.

त्यानंतर किरकोळ वादावरून दोघांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अजय नात्रे पाइपने मारहाण करत असताना आरोपी पत्नीने पतीचा ओरडतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. या मारहाणीत अमोल यांच्या मान, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. भोसरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

2026-09-26 22:25:20

Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

2026-09-11 05:15:28

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

2026-09-09 17:46:05

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

2026-09-08 19:36:19

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त