कुरंगवडी (ता. भोर) : भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात शेतातील पाण्याच्या पाटावरून उफाळलेल्या जुन्या कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी आरोपी नातेवाईक शामराव चंद्रकांत शिळीमकर (रा. कुरंगवडी) विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कैलास छबनराव शिळीमकर (वय ३६, रा. कुरंगवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने तपास करत आहेत. या घटनेमुळे कुरंगवडी गावात तणावाचे वातावरण आहे.