पिंपरी | देहूरोड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

देहूरोड, (वार्ताहर) – आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे सुमारे अडीच कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने झेंडे मळ्यातील अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत, अशी प्रतिक्रिया देहूरोेड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष प्रवीण झेंडे यांनी दिली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील झेंडेमळा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते (बुधवारी, दि.९) झाले. यावेळी ते बोलत होते.
प्रवीण झेंडे म्हणाले की, कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेला आमचा झेंडेमळा विकासापासून वंचित होता. बोर्डाकडून मिळणारा निधी अल्प प्रमाणात असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असत.
रस्त्यासारख्या मुलभुत सुविधेसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आमदारांनी अडीच कोटी इतका भरीव विकासनिधी दिल्याने झेंडे मळ्यातील सर्व नागरिक आमदार सुनील शेळके यांच्या कामावर नक्कीच समाधानी आहेत.
झेंडे मळ्याप्रमाणेच देहूरोड परिसरातील विविध भागांमध्ये आमदार शेळके यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.





