Bhiwandi News : भिवंडीत 84 एलपीजी सिलेंडर्स जप्त; तिघांवर गुन्हा दाखल
भिवंडी (Bhiwandi News) शहरात एका खाजगी ठिकाणी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले २.२२ लाख रुपये किमतीचे तब्बल ८४ एलपीजी सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत.

Bhiwandi News : भिवंडी (Bhiwandi News) शहरात एका खाजगी ठिकाणी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले २.२२ लाख रुपये किमतीचे तब्बल 84 एलपीजी सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम आशियातील संकटामुळे घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा करणे आणि त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या कडक देखरेखीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई (Bhiwandi News) करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या सरकारने वारंवार फेटाळून लावल्या आहेत, तरीही अनेक ठिकाणी सिलिंडर्स खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली विभागाच्या अधिकाऱ्यांनी 14 मार्च रोजी वालगाव परिसरातील वर्धमान कंपाऊंड येथे छापा टाकला. त्यावेळी आवश्यक परवानग्या नसतानाही विक्रीच्या उद्देशाने एलपीजी सिलिंडर्सचा बेकायदेशीर साठा करून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. या जप्त करण्यात आलेल्या 84 सिलिंडर्सपैकी 34 सिलिंडर्स भरलेले होते, तर उर्वरित सिलिंडर्स रिकामे होते.
जप्त करण्यात आलेल्या या सिलिंडर्सची एकूण किंमत 2.22 लाख रुपये इतकी आहे. सिलिंडर्सची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेले तीन टेम्पो आणि दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त (Bhiwandi News) केल्या आहेत.
अत्यावश्यक वस्तू कायदा आणि एलपीजी नियमन आदेश यांच्या संबंधित कलमांन्वये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.






