लोणी धामणी -जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत वडजादेवी यात्रा मोठ्या उत्साहात झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (12 मार्च) देवीची महापूजा झाली. बैलगाड्याच्या भव्य शर्यतीमध्ये 185 बैलगाडे धावले. नंतर शेरणी, पालखी व विठ्ठलकृपा कला नाट्य मंडळ यांचा भारूडाचा कर्यक्रम पार पडला.
बैलगाड्याच्या भव्य शर्यतीत दत्तात्रय बबन आवटे यांच्या गाड्याने घाटाचा राजा किताब पटकविला. द्वितीय क्रमांक बाळासाहेब विठ्ठल पांडे (शिंगवे), तृतीय राहुल संजय कराळे (पिंपळगाव). अंतिम फेरीत प्रथम क्रमांक- सावता महाराज बैलगाडा संघटना (शिंगवे), द्वितीय मारुती नामदेव निघुट (जवळे), तृतीय महेश अर्जुन डोके (वडगाव काशिंबेग) यांचा आला. विजेत्या बैलगाडा मालकांना चषक व 85 हजार रूपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. या शर्यतीत एकूण 185 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला.
यात्रेचे नियोजन भीमाशंकर कारखाना संचालक रामचंद्र ढोबळे, सरपंच ऍड. रूपाली भोजणे, उपसरपंच रवींद्र भांड, यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, चेअरमन खंडु भोजणे, रवींद्र काकडे, के. डी. भोजणे, शिवाजी भोजणे, गणपत भोजणे, आनंदा भोजणे, प्रदीप बढेकर, नवनाथ जारकड, पै. नंदु ढोबळे, उद्योजक नवनाथ वैद, डॉ. संतोष ढोबळे, संतोष पाचपुते सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींनी केले.