भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे; गृहमंत्र्यांची माहिती
Updated On:

मुंबई: भीमा कोरेगाव येथे झालेल्या आंदोलनामध्ये मागील सरकारच्या काळात ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील आतापर्यंत ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर ५४८ मराठा तरूणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्याबाबत माहिती घेऊन ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
बाकीच्या गुन्ह्यांची तपासणी करून जे दोषी नाहीत त्यांच्यावरचे गुन्हे देखील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारतर्फे मागे घेण्यात येतील. मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरही गुन्हे दाखल केले होते. त्यात ५ पैकी ३ आंदोलकांवरील गुन्हेसुद्धा मागे घेतले जातील, असा विश्वास अनिल देशमुख यांनी दिला.





