Pune: सोलापूरकरांच्या ‘त्या’ विधानाबाबत भीम अनुयायी आक्रमक; आंदोलकांनी बॅरिगेटिंग तोडत घरात घुसण्याचा केला प्रयत्न

Updated On:
Pune: सोलापूरकरांच्या ‘त्या’ विधानाबाबत भीम अनुयायी आक्रमक; आंदोलकांनी बॅरिगेटिंग तोडत घरात घुसण्याचा केला प्रयत्न

पुणेः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर आता डॅा. बाबासाहेब आंबडेकर यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनी या दोन्ही महापुरुषांवर केलेल्या बेताल विधानांमुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीकेची झोड उठवली जात आहे. शिवप्रेमी आणि आंबेडकर अनुयायींनी सोलापुरकर यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुण्यातील राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर भीम अनुयायी आक्रमक झाले असून रिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडिया आठवले गटाने येथे त्यांच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले. तसेच त्यांच्या विधानाचा निषेधही नोंदवला. सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना सोलापूरकर यांच्या घराबाहेरच अटकाव घातला. सोलापूरकर यांच्या घराबाहेर बॅरिगेंटिक करण्यात आले होते.

बॅरिगेटिंग तोडत आत घुसण्याचा प्रयत्न

आज सकाळपासून पुणे पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्यानंतर देखील सोलापूरकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनुयायांनी सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बॅरिगेटिंग तोडत आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधानाची प्रत हातात घेऊन वंचितच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले.

आणखी संबंधित बातम्या

Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा पुण्यात धडकणार; अभिजित दिपकेची मराठीत पोस्ट

2026-06-09 08:51:09

Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा पुण्यात धडकणार; अभिजित दिपकेची मराठीत पोस्ट

Cockroach Janata Party Pune : दिल्लीनंतर पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा; 'या' दिवशी होणार जोरदार आंदोलन

2026-06-08 22:06:32

Cockroach Janata Party Pune : दिल्लीनंतर पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा; 'या' दिवशी होणार जोरदार आंदोलन

Harmanpreet Savage Reply : "मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं का?" पत्रकाराला उलट प्रश्न विचारत हरमनप्रीत कौरने घेतली फिरकी, पाहा VIDEO

2026-06-08 19:49:50

Harmanpreet Savage Reply : "मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं का?" पत्रकाराला उलट प्रश्न विचारत हरमनप्रीत कौरने घेतली फिरकी, पाहा VIDEO

Pune Gramin : तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी कारवाई; विश्वसंस्कृती बंगला/फार्महाऊस लोणीकंद पोलिसांकडून सील

2026-06-07 22:46:36

Pune Gramin : तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी कारवाई; विश्वसंस्कृती बंगला/फार्महाऊस लोणीकंद पोलिसांकडून सील

Weather update : राज्‍यात मान्सूनची आगेकूच.! मुंबईसह कोकणात मान्‍सूनची जोरदार हजेरी

2026-06-06 21:35:14

Weather update : राज्‍यात मान्सूनची आगेकूच.! मुंबईसह कोकणात मान्‍सूनची जोरदार हजेरी