प्रभात वृत्तसेवा भिगवण – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भिगवणच्या मा.सरपंच दिपीका क्षीरसागर यांच्या वतीने (दि.१३) रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला सणाचा आनंद मिळावा यासाठी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आल्याचे दिपीका क्षीरसागर यांनी सांगितले. सचिन बोगावत व जयश्री सरके यांनी मनोगत व्यक्त करीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रमेश धवडे, संजय रायसोनी, आण्णासाहेब धवडे, सचिन बोगावत, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, आप्पासाहेब गायकवाड, सूरज खटके, शहाजी गाडे, पिंटू शेलार, स्वप्नील बंडगर, राजू हगारे, अमोल शिंदे, मुमताज शेख, प्रतिमा देहाडे, विशाल पाचांगणे, कपिल लांडगे, विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षिका जयश्री सरके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक हनुमंत पानसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ वाघमारे यांनी केले.