Maha Shivratri 2025 : महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात भक्त तल्लीन…

आज महाशिवरात्री असल्याने देशभरातील प्रमुख मंदिरासह इतर मंदिरांमध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागल्याचे पाहायला मिळत आहे. महाशिवरात्राचे महत्व अलौवकिक असून या दिवशी देव प्रकाश-लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. सोबतच भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह देखील झाला होता. यामुळे या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ, प्रयागराग, अयोध्या, नाशिक, देवघर ते उज्जैनपर्यंत देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांकडून हर हर महादेवचा जयघोष केला जात आहे. काल मध्यरात्रीपासूनच भाविक महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. महाशिवरात्री म्हणजे महादेवाची रात्र. या दिवशी शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असे मानले जाते. त्याच वेळी शिवाचे दर्शन झाले. प्रकाश-लिंगाच्या रूपात देव प्रकट झाले होते, असे सांगितले जाते.
#WATCH | Varanasi, UP: Mangala Aarti was performed at Shri Kashi Vishwanath Temple on the occasion of Maha Shivratri.
(Source: Shri Kashi Vishwanath Mandir) pic.twitter.com/nHWYnzQ3CQ
— ANI (@ANI) February 25, 2025
महाशिवरात्रीला वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात मंगल आरती करण्यात आली असून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसाठी दरवाजे उघडण्यात आले आहेत. उज्जैन येथील महाकाल मंदिरात भस्म आरती करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त महाकाल मंदिरात भाविकांनी भजन-कीर्तन केले. त्यासोबतच हर हर महादेवचा जयघोष केला.
#WATCH | Varanasi, UP | Flower petals are being showered at saints at Kashi Vishwanath Temple on the occasion of #Mahashivratri2025 pic.twitter.com/PpIEcj8WIk
— ANI (@ANI) February 26, 2025
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाचा आज शेवटचा दिवस असून पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याचवेळी झारखंडच्या देवघरमध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे. बाबा बैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अयोध्येतही भाविक सरयूमध्ये पवित्र स्नान करत आहेत. गुजरात, हैदराबाद, बंगालसह सर्व राज्यांतून भाविक येथे पोहोचले आहेत.
#WATCH | Madhya Pradesh: Aarti is being performed at Ujjain's Shri Mahakaleshwar Jyotirlinga Temple on the occasion of Maha Shivratri pic.twitter.com/HZWuvnT3Zw
— ANI (@ANI) February 25, 2025
या प्रमुख मंदिरात भाविकांची गर्दी
महादेवाच्या दर्शनासाठी लखनौच्या मनकामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे.
दिल्लीतील चांदणी चौकातील गौरी शंकर मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून भाविक महादेवाची प्रार्थना करत आहेत.
महाशिवरात्रीच्या एक दिवस आधीच कोलकात्यात भाविकांची गर्दी होऊ लागली होती. दर्शनासाठी लोक भूतनाथ मंदिरात पोहोचले आहेत.
भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात जल्लोषाचे वातावरण आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असते. यावेळी देखील त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात भारतीय लष्कराच्या सहा माजी प्रमुखांनी पूजा केली.
महत्व काय?
महाशिवरात्रीला उपवास, मंत्रोच्चार आणि रात्रीच्या जागराचे महत्त्व आहे. हा फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. देवाचा जलाभिषेक आणि पंचामृत अभिषेक असे विधी केले जातात. यासोबतच धतुरा, बिल्वपत्र, रुद्राक्ष, भस्म, गंगाजल, फळे आणि फुलांनी पूजा केली जाते.





