भातखळकरांचा राऊतांना सणसणीत टोला,’…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे’
Updated On:

मुंबई – मागील काही दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी मराठी माणसाचं घर जप्त केल्याचे म्हटले होते. तर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांचे ट्विट
”पत्रा चाळीतल्या मराठी माणसांना लुबाडून तर ही संपत्ती गोळा केली होती. तुमचा अपमान हा मराठी माणसाचा अपमान असेल तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे. बरोबर ना संपादक महोदय!”






