भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Bharti Singh | कॉमेडियन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार आहे. भारतीने इन्स्टाग्रामवर तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली आहे. लग्नानंतर आठ वर्षांनी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. भारती व हर्ष यांना एक मुलगा आहे. आता लवकरच त्यांच्या घरी आणखी एका चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे.
भारतीने इन्स्टाग्रामवर पती हर्ष लिंबाचियाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसते. “आम्ही पुन्हा गरोदर आहोत,” असं कॅप्शन भारतीने या फोटोला दिलं आहे. भारती सिंगच्या या फोटोवर चाहते व सेलिब्रिटी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. Bharti Singh |
View this post on Instagram
भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. लक्ष्य साडेतीन वर्षांचा झाला आहे. आता भारती सिंग ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवणार आहे. दरम्यान, भारती सिंग व हर्ष यांनी अनेकदा त्यांना मुलगी हवी, अशी भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा:





