Bharti Singh: भारती सिंह ने पेटवली महागडी लबूबू डॉल… कारण ऐकून व्हाल थक्क!

Bharti Singh: कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट भारती सिंग सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती स्वतःचा यूट्यूब चॅनलही चालवते. भारती अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती लोकप्रिय लबूबू डॉल जाळताना दिसत आहे. या डॉलमुळे तिचा तीन वर्षांच्या मुलगा गोलाच्या वागणुकीत अचानक बदल झाल्याचं तिने सांगितलं आहे.
घरात नको होती लबूबू डॉल
लबूबू डॉल ही तिच्या मोठ्या डोळ्यांमुळे आणि हटके लुकमुळे सध्या खूप प्रसिद्ध झाली आहे. अनेक सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या डॉलसाठी वेड पाहायला मिळालं. पण भारतीच्या मते ही डॉल त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा घेऊन आली. त्यामुळे तिने ती डॉल आगीत जाळून टाकली.
डॉल आल्यावर गोला झाला खूपच शरारती
भारतीच्या नवऱ्याने, हर्ष लिम्बाचियाने, गोला साठी ही डॉल विकत घेतली होती. मात्र डॉल आल्यापासून गोला फारच चिडचिडा, ओरडणारा आणि ऐकून न घेणारा झाला होता. भारती म्हणाली, “सुरुवातीला मी हे मजेत घेतलं, पण जेव्हा घरातले इतर लोकही काहीतरी बिनसल्याचं म्हणू लागले, तेव्हा मी ती डॉल जाळायचं ठरवलं.”
डॉलला म्हणायचे ‘डेव्हिल’
भारतीने पुढे सांगितलं, “कदाचित मी जरा जास्तच रिऍक्ट झाले असेन, पैसे वाया घातले असतील, पण मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. ही डॉल इतकी विचित्र होती की लोक विचारायचे, ‘हे काय आहे?’” तिच्या कुटुंबात ही डॉल ‘डेव्हिल’ म्हणून ओळखली जाऊ लागली होती.
शेवटी घेतला निर्णय
अखेर भारतीने ही डॉल जाळून टाकण्याचा निर्णय घेतला आणि युट्यूब व्लॉगमधून ही गोष्ट चाहत्यांना सांगितली. तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण तिचं कौतुक करत आहेत, तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.





